ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती
माहिती
शिरसाटे हे गाव नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात वसलेले आहे. हे गाव निसर्गरम्य परिसरात असून शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ९९९ हेक्टर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शिरसाटे गावाची एकूण लोकसंख्या सुमारे १,२८० आहे, ज्यामध्ये सुमारे ६५९ पुरुष आणि ६२१ महिला आहेत. गावात अंदाजे २५५ कुटुंबे वास्तव्यास आहेत. गावात पोस्ट ऑफिस किंवा रेल्वे स्थानक नाही, परंतु जवळचे मोठे गाव म्हणजे इगतपुरी असून ते सुमारे ३७ किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक शहर गावापासून सुमारे ३१ किलोमीटरवर आहे. शिरसाटे गाव परिसर हिरवागार असून येथील लोक साधे, मेहनती आणि एकमेकांशी घट्ट नात्याने जोडलेले आहेत. गावातील प्रमुख उत्पन्नाचे साधन शेती असून पिकांमध्ये तांदूळ, मका, आणि भाजीपाला यांचा समावेश होतो. गावात प्राथमिक सुविधा उपलब्ध असून लोक पारंपरिक तसेच आधुनिक शेती पद्धती वापरून आपले उपजीविकेचे साधन चालवतात.
२०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार शिरसाटे लोक्संख्याचा संक्षिप्त आढावा दिला आहे.
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
| अ.क्र. | तपशील | एकूण | पुरुष | स्त्री |
|---|---|---|---|---|
| १ | एकूण लोकसंख्या | 1260 | 660 | 600 |
| २ | बाल लोकसंख्या (०-६) वर्षे | १०३ | ५४ | ४९ |
| ३ | अनुसूचित जाती (SC) | १ | १ | – |
| ४ | अनुसूचित जमाती (ST) | ९६६ | ५२३ | ४४२ |
| ५ | साक्षर लोकसंख्या | ६९० | ४१४ | २७६ |
| ६ | निरक्षर लोकसंख्या | २७८ | ११२ | १६६ |
“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”
गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला
राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
प्रशासकीय संरचना
ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील
| अ.क्र. | लोकसेवेचे नाव | कामकाजाचे दि. | प्र. फी | पदनिर्देशित अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १. | जन्म नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| २. | मृत्यू नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ३. | विवाह नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ४. | दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | सा.ग.ट.बि.अ |
| ५. | ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ६. | नमुना ‘८’ चा उतारा | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ७. | निराधार असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | ग्रामपंचायत अधिकारी |